Alandi : ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात रथोत्सव साजरा

एमपीसी न्यूज – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (Alandi)यांचा रथोत्सव टाळ मृदुंगाच्या गजरात, खांद्यावर पताका घेत, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हरिनामाच्या गजरात, ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात असा संपन्न झाला.

तत्पूर्वी रथोत्सवानिमित्ताने माऊली मंदिर येथून संत ज्ञानेश्वर (Alandi)यांच्या पालखीने गोपाळपुरा मंदिराकडे प्रस्थान केले होते.गोपाळपुरा मंदिर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज रथोत्सवसाठी रथात विराजमान झाले.

श्रींची तुळशी हार,पुष्पहार व वस्त्राद्वारे इ.सजावट करण्यात आली.यामुळे माऊलीं चे लोभस असे रूप दिसून येत होते.तसेच रथाची आकर्षकरीत्या फुलसजावट करण्यात आली होती.

Nigdi : पतीवर वारंवार केलेले विषप्रयोग फसले म्हणून पत्नीने दिली पतीच्या खुनाची सुपारी

व श्रीं ची आरती करण्यात आली. व माऊली माऊली च्या नामघोषात रथोत्सवाला सुरवात झाली.श्री नृसिंह मठा समोर श्रींचे स्वागत व पूजन करण्यात आले.माऊलींच्या रथोत्सव मार्गावर सुंदर तऱ्हेने रांगोळी काढण्यात आली होती.पालिका चौकात पालिकेच्या आधिकारी कर्मचारी यांनी श्रींच्या रथाचे स्वागत करून त्यावर पुष्पवृष्टी केली.यावेळी माऊलींच्या रथाने गोपळपुरा ते महाद्वार चौक अशी परिक्रमा केली.

त्यानंतर रथातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीमध्ये विराजमान करण्यात आले. व माऊली मंदिरामध्ये त्यांनी प्रवेश केला. यावेळी पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त होता. यावेळी पालखी सोहळामालक, व्यवस्थापक, मानकरी, सेवेकरी, पुजारी, आळंदीकर ग्रामस्थ आणि वारकरी भाविक भक्त‌ बहुसंख्येने उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.