Alandi News : सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी महोत्सवात श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रत प्रकाशन सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज : आळंदी येथील इंद्रायणी घाटावर सद्गुरू जोग (Alandi News) महाराज पुण्यतिथी महोत्सवात आज दि.6 फेब्रुवारी रोजी सकाळी ह भ प कन्हैया राजपूत यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले.
कृष्ण बालक्रीडा,बाललीला, कृष्ण व त्यांचे सवंगडी मित्र ,बाल गोपाल यांनी एकत्रितपणे केलेल्या सर्व अन्न पदार्थांच्या म्हणजेच काल्याच्या भोजनाचा प्रसंग येथे त्यांनी सांगितला.कीर्तन संपन्न झाल्यानंतर काल्याच्या प्रसादाचे येथे भाविकांना वाटप करण्यात आले. (Alandi News) तद्नंतर वारकरी शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रतीचे प्रकाशन शांतिब्रम्ह ह भ प मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
Pune News : कर्वेनगर येथे मुक्तछंद तर्फे उद्योजकांसाठी मोफत कार्यशाळा
यावेळी शास्त्री महाराज,नाना चंदीले,डॉ. नारायण महाराज जाधव,तुकाराम महाराज मुळीक,डी डी भोसले पा. इ. मान्यवर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.