Pune News : कर्वेनगर येथे मुक्तछंद तर्फे उद्योजकांसाठी मोफत कार्यशाळा

एमपीसी न्यूज – मुक्तछंद प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, मुक्तछंद, घे भरारी आणि देआसरा फाउंडेशन यांच्या वतीने उद्योजकांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. (Pune News)  ही कार्यशाळा 11 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ ते  दुपारी दोन वाजेपर्यंत पंडित फार्म्स, कर्वेनगर, पुणे या ठिकाणी होणार आहे.

यामध्ये 11 वे 12 फेब्रुवारी रोजी शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्कशॉप चे उदघाटन केंद्रीय कॅबिनेट मंत्री, सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते पार पडणार आहे. या वर्कशॉपचे आयोजन माजी आमदार व राष्ट्रीय उपाध्यक्षा, राष्ट्रीय महिला मोर्चा प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले आहे.या वर्कशॉप उद्योजकांसाठी विनामूल्य असणार आहे.

यामध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे . MSME च्या विविध योजनांवर स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे  मार्गदर्शन करतील आणि उपस्थित उद्योजकांच्या शंकांचे निरसन करतील. ‘मानसिकता व्यवसायवृध्दीची’ या विषयावर वक्त्या: नयना चोपडे (चेअरमन, सलून अँपल), ‘कर्जसहाय्यासाठीची पूर्वतयारी’ या विषयावर वक्त्या: डॉ. ज्योती गोगटे, (देअसरा एक्स्पर्ट, बिझनेस मॅनेजमेंट अ‍ॅण्ड अॅडमिनिस्ट्रेशन) , ‘उद्योजकांसाठी बँकेच्या योजना’ या विषयावर वक्त्याः अनुजा संत (शाखा व्यवस्थापक, जनता सहकारी बैंक) आणि ‘व्यवसायासाठी सोशल मीडिया चा वापर ‘या विषयावर साहिल खरे (डिजिटल मार्केटर, upGrowth) या सर्वांचे मार्गदर्शन असणार आहे.

Pune News : डॉ. सदानंद मोरे, इंद्रजित भालेराव, मंगेश काळे, मोनिका गजेंद्रगडकर यांना राष्ट्रीय ललित कला सन्मान’ पुरस्कार जाहीर

उद्योगांसाठी आवश्यक असलेले ‘उद्यम आधार कार्ड ‘  प्रत्येक सहभागी उद्योजकाला मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. अशी माहिती माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिली. या परिसंवादाचा लाभ जास्तीतजास्त उद्योजकांनी घ्यावा असे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

त्याच ठिकाणी 11 व 12 फेब्रुवारी रोजी मुक्तछंद तर्फे ‘पुणे शॉपिंग फेस्टिव्हल, धागा ‘ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.  यात अनेक प्रकारच्या नाविन्यपूर्ण वस्तूंची, साड्यांची, इतर कपड्यांची आणि खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. हॅन्डमेड आणि हॅन्ड क्राफ्टेड प्रोडक्टस् होम डेकोर, ज्वेलरी, (Pune News) एथनिक साडी, ड्रेस मटेरियल, बॅग्ज्, पर्सेस फॅशन वेअर,  फुड आणि बरंच काही असणार आहे. ग्राहकांनी या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी असे आवाहन डॉ. मेधा कुलकर्णी  यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.