Talegaon Dabhade : ज्येष्ठ उद्योजक शिवाजी भेगडे यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ उद्योजक, पुणे जिल्हा फुल उत्पादक(Talegaon Dabhade) संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी (आण्णा) उत्तम भेगडे (वय 59) यांचे बुधवारी (दि. 10) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. 
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन भाऊ, बहिण, चुलते, पुतणे असा परिवार (Talegaon Dabhade)आहे. भेगडे यांनी स्वतः आधुनिक पद्धतीने शेती करून तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठेवला. आमदार कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.

कामगार नेते पै संभाजी भेगडे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. त्यांची अंत्ययात्रा हर्षल रेसिडेन्सी, वतननगर तळेगाव चाकण रोड, तळेगाव स्टेशन येथील राहत्या घरापासून बुधवारी सकाळी 11 वाजता निघेल.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.