Pune: महेश काळेंच्या लाईव्ह कार्यक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

एमपीसी न्यूज –  सूर निरागस हो… या हृदयाचा ठाव घेणाऱ्या सादरीकरणाने (Pune)गुढीपाडव्याच्या संध्येला अवघा परिसर निनादून गेला. प्रख्यात गायक महेश काळे यांच्या सह श्रोत्यांनी देखील वाद्यांच्या तालावर ‘मोरया मोरया’ चा जयघोष केला आणि  सूर सुमनांनी रसिकांची ओंजळ भरली. भक्तीसंगीत, नाट्य गीतांच्या सादरीकरणासह शास्त्रीय गायनाची परिपूर्ण मेजवानी रसिकांना मिळाली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती (Pune)मंदिराच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून संगीत महोत्सवाचे आयोजन बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या प्रांगणात केले आहे.

xr:d:DAGB-UJz0vo:10,j:7645284768977527166,t:24041005

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरुवात

महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव  गायकवाड, गायक महेश काळे, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय हलवाई, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राग यमन सादर करीत महेश काळे यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर सादर झालेल्या प्रत्येक सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.  ज्येष्ठ नागरिकांसोबतच तरुण वर्गाने देखील संख्येने हजेरी लावली होती.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.