Pune News : खराडी येथे बांधकामसाईटवर सुरुंगाचा स्फोट; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यातील खराडी भागात बांधकाम साईटवर झालेल्या सुरुंगाच्या स्फोटात एका मजूराचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. (Pune News) हा स्फोट सोमवारी (दि.6) प्लॅनेज कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांच्या बांधकाम साईटवर झाला.

कादीर रेमन शेख (वय 23, सध्या रा. लेबर कॅम्प, खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. स्फोटात उडालेला दगड लागून नरेश मनुचौधरी याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. निष्काळजीपणे स्फोटके उडविल्याप्रकरणी सचिन दिलीप आटपाडकर (वय 38), गौतम मंडल (वय 36), दीप मार्सकोले (वय 23, तिघे रा. घोटावडे, ता. मुळशी, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Alandi News : सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी महोत्सवात श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रत प्रकाशन सोहळा संपन्न

खराडी भागात प्लॅनेज कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कडून बांधकाम प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. खोदलेल्या खड्ड्यात सुरुंग लावण्यात आला. सुरुंगाचा स्फोट‌ झाल्यानंतर खड्ड्यातील दगड उडाले. एक दगड बांधकाम मजूर शेख याच्या डोक्याला लागला. (Pune News) तेथे काम करणारा मजूर मनुचौधरीच्या हातावर दगड लागला. गंभीर जखमी झालेल्या शेख याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. ठेकेदाराच्या बेजबाबदारपणा, तसेच बांधकाम मजुरांना सुरक्षाविषयक साहित्य न पुरवल्याने दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.