Alandi : वडिलांसोबत बोलत थांबल्याने मुलगा आणि पत्नीकडून तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज – मित्र, मित्राची बायको आणि तिची मैत्रीण असे तिघेजण आरोपीच्या वडिलांना बोलत थांबले. त्यामुळे रागावलेल्या दोन मुलांनी आणि त्यांच्या आईने वडिलांना बोलल्याच्या रागातून तिघांना मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 25) पहाटे एकच्या सुमारास च-होली खुर्द घोलपवस्ती येथे घडली.

किरण अशोक मानकर (वय 39, रा. च-होली खुर्द, घोलपवस्ती, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शुभम संतोष घोलप, तेजस संतोष घोलप आणि आरोपींची आई या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण, त्यांची पत्नी आणि त्यांची मैत्रीण हे तिघेजण जेवण करून संस्कार गुरुकुल शाळेसमोर थांबले होते. त्यावेळी आरोपीचे वडील संतोष घोलप तिथे आले. त्यामुळे फिर्यादी संतोष घोलप यांच्याशी गप्पा मारत थांबले. त्यावेळी आरोपी तिथे आले आणि ‘माझ्या वडिलांसोबत राहू नकोस’ असे म्हणत संतोष घोलप यांचे दोन मुले आणि पत्नी या तिघांनी मिळून फिर्यादी किरण, त्यांची पत्नी आणि मैत्रीण या तिघांना शिवीगाळ करत मारहाण केली.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस याचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.