Alandi : लक्ष्मी मेटल कंपनीत ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला नाही; महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) जवळ लक्ष्मी मेटल या कंपनीत आज सायंकाळी आग लागली. प्राथमिक माहितीनुसार ही आग इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन लागल्याचे समोर आले होते. परंतु, यावर आता महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी स्पष्टीकरण देत ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झालेला नाही. त्यातून होणारा इलेक्ट्रिक सप्लाय बंद आहे. ट्रान्सफॉर्मर बंद अवस्थेत होता. असे म्हंटले आहे. 

याबाबत माहिती अशी की, आळंदी नजीक मरकळ रस्त्यावरील सोळू (ता. खेड) या गावात आज दुपारी आग लागली. या ठिकाणी असलेल्या वितरण रोहित्राचा (Distribution Transformer) स्फोट होऊन आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. महावितरणच्या चाकण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे व सहायक अभियंता संदीप कुऱ्हाडे यांनी तातडीने सोळू येथे वीजयंत्रणेची पाहणी केली. यामध्ये घटनास्थळी असलेल्या 63 केव्हीए क्षमतेच्या रोहित्राचा प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचा स्फोट झाल्याचे आढळून आले नाही. तसेच आग लागल्याचे देखील दिसून आले नाही.

आग विझवल्यानंतरही हा रोहित्र सुस्थितीत असल्याचे आढळून आले. मात्र बाजूची भिंत पडल्याने रोहित्राचे वीजखांब वाकले आहेत. आणखी एक वस्तुस्थिती अशी आहे की, या रोहित्रावरून केवळ एका ग्राहकाला वीजजोडणी देण्यात आली आहे. मात्र संबंधित ग्राहकाचे वीजबिल थकीत असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून या रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे सोळू येथील आगीशी महावितरणच्या रोहित्राचा कोणताही संबंध नसल्याचे घटनास्थळी केलेल्या प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे.

Pune : ‘निर्भय बनो’ ची सभा ही गुंडशाही व झुंडशाही विरोधात – अरविंद शिंदे

या प्रकरणावर पोलीस उपायुक्त शिवाजी पवार म्हणाले, “कंपनीतील एका खोलीमध्ये स्पोर्ट झाला आहे. यामध्ये आतापर्यंत आठ जण जखमी असल्याचे समोर आले आहे. सर्व जखमींना पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.