Pune : ‘निर्भय बनो’ ची सभा ही गुंडशाही व झुंडशाही विरोधात – अरविंद शिंदे

एमपीसी न्यूज – ‘निर्भय बनो’ ची उद्या शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी रोजी होणारी (Pune) सभा ही गुंडशाही व झुंडशाहीच्या विरोधात घेतली आहे. परंतु, आत्ताच काही वेळेपूर्वी भारतीय जनता पार्टीचे अतिशय संस्कारी अध्यक्ष धीरज घाटे यांनी ही सभा उधळवून लावायची धमकी दिली आहे आणि तसे त्यांनी तेथील पोलीस स्टेशनला निवेदनही दिले आहे. खरे तर आता नविन पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे आले आहेत आणि ते कायदा व सुव्यवस्था या बाबत अतिशय दक्ष आहेत. त्यांनी पुण्यातील गावगुंड ते मोठे गुंड सगळ्यांची परेड पोलीस आयुक्तालय येथे काढली होती. त्यामुळे या धर्मांध गुंडांचा बंदोबस्त पोलीस आयुक्त निश्चित करतीलच, परंतु या सभेसाठी इंडिया आघाडीमधील सर्व घटक पक्ष व महाविकास आघाडी हे तेथे लोकशाही वाचविण्यासाठी आणि ‘निर्भय बनो’ सभा ही व्यवस्थित पणे पार पाडण्यासाठी संरक्षण देण्याचे काम करणार आहेत, अशी माहिती पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली.

खरे तर संविधानाने आपल्याला आपले मत मांडण्याचा अधिकार, भाषणाचा अधिकार दिलेला आहे. असे असतानाही  (Pune) काही संविधान विरोधी लोक गुंडशाही व झुंडशाहीच्या माध्यमातून पुण्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तो प्रयत्न आम्ही कदापीही यशस्वी होवू देणार नाही.

PMPML : पीएमपीएमएलमध्ये मोबाईलवर व्हिडिओ बघताना वापरावा लागणार इयरफोन

लोकशाही ही असल्या धमक्यांना घाबरत नाही. उद्याची सभा ही यशस्वीरित्या पार पडेल, याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे, असेही अरविंद शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.