PMPML : पीएमपीएमएलमध्ये मोबाईलवर व्हिडिओ बघताना वापरावा लागणार इयरफोन

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (PMPML) बसेस मध्ये हेडफोन/इयर फोन शिवाय मोबाईलवर ऑडिओ/व्हिडीओ ऐकण्यास, बघण्यास तसेच मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलण्यास प्रवाशांना मनाई करण्यात आलेली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम कलम 38/112 नुसार कारवाई केली जाणार आहे.

Alandi : लक्ष्मी मेटल कंपनीत इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे व पिंपरी-चिंचवड शहर, शहरा लगतची उपनगरे व ग्रामीण भागात पी.एम.आर.डी.ए. कार्यक्षेत्रा मध्ये बससेवा पुरविण्यात येते. सध्या परिवहन महामंडळाकडून 369 बस मार्गांवर दररोज सरासरी 1 हजार 785 बसेस संचलनात असून सरासरी 13 लाखांपेक्षा अधिक प्रवाशी प्रवास करतात.

काही मार्गांवर प्रवास करणारे प्रवाशी मोबाईलवर हेडफोन/इयरफोन (PMPML) शिवाय ऑडिओ/व्हिडीओ पाहत असताना मोठा आवाज ठेवत असल्यामुळे बसमध्ये इतर प्रवाशांना नाहक त्रास होत असल्याच्या तक्रारी महामंडळाकडे प्राप्त झाल्या आहेत.

प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पी.एम.पी.एम.एल. प्रशासनाकडून बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सूचित करण्यात येते की, मोबाईलवर ऑडिओ/व्हिडीओ ऐकत/पाहत असताना हेडफोनचा वापर करणे आवश्यक आहे.मात्र कंडक्टर कडून तिकीट घेताना हेडफोनचा वापर करू नये.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.