Alandi : लक्ष्मी मेटल कंपनीत इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

एमपीसी न्यूज – कंपनीमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट (Alandi) झाला. ही घटना आळंदी जवळ लक्ष्मी मेटल या कंपनीत गुरुवारी (दि. 8) सायंकाळी घडली.

 Wakad : दुबई ट्रिपच्या बहाण्याने सहा लाख 40 हजारांची फसवणूक

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी जवळ सोळू या गावामध्ये लक्ष्मी मेटल ही कंपनी आहे. कंपनीमध्ये इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी या ट्रान्सफॉर्मरला आग लागली आणि ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला.

यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाचे चिखली, मोशी, भोसरी आणि मुख्य अग्निशमन केंद्रातील पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कुलिंग ऑपरेशन सुरू (Alandi) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.