Alandi Fire News : आळंदी येथे लागलेल्या आगीने आजूबाजूच्या गावांचे झाले नुकसान; चारा, वाहने आणि प्राण्यांना इजा

एमपीसी न्यूज : आज सायंकाळी 05.09 च्या सुमारास सोलू आळंदी मरकल रोड (खेड) येथील स्पेसिपिक आलोय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये (Alandi Fire News) आग लागली. ही कंपनी अंदाजे चार वर्षा पासून बंद स्थितीत आहे. असे स्थानिकांकडून समजले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्रथमदर्शनी ही आग ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटांमुळे झाल्याचे समोर आले होते. परंतु, येथील ट्रान्सफॉर्मर बंद असल्याचे महावितरणने स्पष्ट केले. तरीही आजूबाजूच्या गावात या आगीमुळे फार नुकसान झाल्याचे समोर आले आहे. 

ही आग  शंभर मीटर एरियामध्ये पसरली. ही कंपनी गावठाण परिसरात असल्यामुळे या आगीच्या ठिणग्या उडाल्यामुळे गवताच्या गंजी, गुरांचा चारा तसेच गुरांना देखील हानी झाली. चार चाकी वाहने, दुचाकी वाहाने, तसेच घरांचे नुकसान झाल्याचे निर्शनास आले आहे.

PMRDA अग्निशमन विभाग, पिंपरी चिंचवड अग्निशमन दल, आळंदी नगरपरिषद, पुणे महानगर पालिका अग्निशमन दल या (Alandi Fire News) अग्निशमन वाहनांच्या तात्काळ मदतीने आग लवकर आटोक्यात आणण्यात आली.

तात्काळ मदत मिळाल्यामुळे बाजूला असलेल्या घरांना सुरक्षित करण्यात आले. आगीच्या ठिकाणी आठ जण जखमी व्यक्ती आढळले. त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालय येथे पाठवण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.