Alandi : पिस्टल व काडतुसासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुणाला आळंदी पोलिसांनी (Alandi) अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.17) सकाळी आळंदी येथे केली.

ब्रह्मदेव माधव लटपटे ( वय 22 रा.आळंदी) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई बाळासाहेब विष्णू खेडकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : भ्याड हल्ल्यांना मी घाबरणार नाही, लोकशाही, पोलीस आणि 5 कोटी मराठ्यांवरील हा हल्ला आहे- नामदेव जाधव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा आळंदी येथील केळगाव येथे शस्त्रासह आरोपी थांबला होता. पोलिसांनी त्याला (Alandi) ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 30 हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्टल व 500 रुपयाचे जिवंत काडतुस असा एकूण 30 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे . आळंदी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.