Album News : प्रेम भावनांना स्पर्श करणारा ‘रंग सावळा’ अल्बम प्रदर्शित

एमपीसी न्यूज: ‘रंग सावळा’ ( Rang Saavala) हा रोमॅंटिक अल्बम ( Romantic Album) प्रदर्शित झाला असून, एका दिवसांत तो पन्नास हजारापेक्षा जास्त नागरिकांनी बघितला आहे. या अल्बममध्ये समीर सकपाळ, वैष्णवी शिंदे, आनंद बुरड हे कलाकार आहेत.

यापूर्वी ‘कॉलेज डायरी’ ( collage Diary) या चित्रपटात हे कलाकार एकत्र झळकले होते. निरंजन पेडगांवकर यांनी या अल्बमला संगीत दिले असून या गीताला त्यांनीच आवाज दिला आहे.

अल्बमचे दिग्दर्शन मंगेश कुलकर्णी यांनी केले आहे. झी म्युझिक ( Zee Music)  कंपनीतर्फे हे गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. या अल्बमसाठी कॅमेरा नकुल काकडे, ड्रोन केशव गोरखे, तर संकलन शुभम राऊत यांनी केले आहे. मेकअप सुजित सुरवसे यांनी, तर वेशभूषेची जबाबदारी प्राजक्ता कोळी यांनी सांभाळली आहे.

रंग सावळा हे गीत अव्यक्त प्रेमभावनांना हळुवार स्पर्श करणारे व पुन्हा प्रेमाची जादू अनुभवायला लावणारे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87a8da82b815634b',t:'MTcxNDE1ODQyNS43MTIwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();