Mann Ki Baat : सकारात्मकता आणि व्हालंटेरिझमची भावना रुजवणारी ‘मन की बात’ – अमित गोरखे

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात (Mann Ki Baat) हा संवादाचा कार्यक्रम येत्या रविवारी शंभरी पूर्ण करणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश सचिव, मन की बातचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक अमित गोरखे (Amit Gorkhe) यांनी मन की बात बाबत सविस्तर लेखा लिहिला आहे.

गोरखे म्हणतात, समाजामध्ये सकारात्मकता आणि व्हालंटेरिझम ( स्वेच्छेने पुढं होऊन काही करण्याची ) भावना रुजवणारी मन की बात आहे. भारतासारख्या देशाच्या उज्वल भविष्यासाठी जन सामान्यांच्या प्रतिभेला सुयोग्य स्थान मिळाले पाहिजे ही आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे आणि ‘ मन की बात ̓ म्हणजे या दिशेने केलेला एक नम्र व छोटासा प्रयत्न आहे. 3 ऑक्टोबर 2014 रोजी मोदी यांनी प्रधानसेवक म्हणून देशाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी त्यांच्या मनामध्ये इच्छा होती की देशाची एकता, आपला महान इतिहास, देशाच्या शौर्याची गाथा, भारताची विविधता, आपली संस्कृती, आपल्या समाजाच्या नसा – नसांमध्ये भरलेला चांगुलपणा, लोकांचा पुरुषार्थ, समर्पण, त्याग, तपस्या अशा सर्व गोष्टी भारताच्या जना – मनांमध्ये पोहचल्या पाहिजेत.

देशाच्या अगदी दुर्गम भागात, अगदी टोकाच्या गावापासून ते मेट्रो शहरांपर्यंत, शेतकरी बांधवांपासून ते युवा व्यावसायिकांपार्यंत अगदी सगळ्या पर्यंत हे पोहचले पाहिजे यातूनच मन की बात च्या प्रवासाला प्रारंभ झाला. देशातील नागरिकांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या कल्पना, समस्या आणि मते ऐकणे या उद्देशाने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ मन की बात ̓ हा उपक्रम सुरु केला.

Chinchwad : आऊट डोअर कंट्रोल पॅनेलची चोरी

या कार्यक्रमाने रेडीओला ऑक्सिजन दिला आहे. हा प्रयोग रेडीओसाठी वरदान ठरला आहे. प्रत्येक महिन्याचा हा पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमामुळे रेडीओला नवसंजीवनी मिळाली आहे. 3 ऑक्टोबर 2014 रोजी दसऱ्याच्या दिवशी ‘ मन की बात रेडीओ ̓चे रेडीओ प्रसारण सुरु झाले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणी आणि डी डी चॅनेलवर प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘ मन की बात ̓ हा कार्यक्रम प्रसारभारती आपल्या आकाशवाणी नेटवर्कवर 23 भाषांमध्ये प्रसारित करते.

या व्यतिरिक्त प्रसारभारती विविध डी डी चॅनेल्सवर या कार्यक्रमाच्या व्हीजुअल आवृत्त्या हिंदी आणि इतर भाषांमध्येही प्रसारित करते. दूरदर्शनचे 34 चॅनेल्स आणि जवळपास 91 खासगी टी व्ही चॅनेल्सद्वारे संपूर्ण भारतात या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते. या कार्यक्रमाच्या (Amit Gorkhe)प्रेक्षकांची संख्या जवळपास 12 कोटी इतकी आहे. या कार्यक्रमामुळे रेडीओमध्ये नागरिकांची रुची वाढली असून जागरुकताही निर्माण झाली आहे.

सरकारच्या विविध योजनांवर व मुद्द्यांवर नागरिकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रमाचा हेतू आहे. या कार्यक्रमात शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि संस्कृतीपासून स्वच्छता आणि लैंगिक समानता यासारख्या सामाजिक समस्यांपर्यंतच्या विविध विषयांचा समावेश झाला आहे. हा कार्यक्रम परस्परसंवादी आहे आणि नागरिकांना पंतप्रधानांनी ज्या विषयांना संबोधित करावेसे वाटेल अशा विषयांसाठी त्यांच्या कल्पना आणि सूचना पाठविण्यास प्रोत्साहित करण्यात येते.

हा कार्यक्रम पंतप्रधान आणि भारतातील नागरिकांमधील संवादाचे एक (Mann Ki Baat) यशस्वी माध्यम आहे. या कार्यक्रमामुळे एकता आणि सहकार्याची भावना वाढविण्यास मदत झाली आहे. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांनी लोक कल्याणाची त्यांची वचनबद्धता आणि उज्वल भारतासाठी त्यांची दृष्टी दाखवली आहे. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा भारतात आले असता मोदी यांनी त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी मोदी यांनी माध्यम निवडले ते रेडीओचे त्यामुळे रेडीओलाही ‘अच्छे दिन आले असे म्हणता येईल.

सुरवातीला हा कार्यक्रम म्हणजे राजकीय व्यासपीठ बनणार म्हणून टीकेचा विषय बनला होता. परंतु कार्यक्रमाचा एक एक भाग प्रसारित होत गेला तसे कोट्यावधी सामान्य लोक या कार्यक्रमाशी जोडले गेले. हळूहळू टीकेचा सूरही मावळत गेला. ज्यावेळी हा कार्यक्रम सुरु केला गेला तेव्हाच मोदी यांनी ठरवल होत की यामध्ये राजकारण नको, सरकारची पाठ थोपटणं नको, तसेच यामध्ये कुठेही मोदी नावाचा उल्लेख नको. त्यामुळेच प्रत्येक भागाच्या आधी आलेल्या पत्रांमध्ये, ऑनलाईन टिप्पणीमध्ये व आलेल्या दूरध्वनीमध्ये श्रोत्यांच्या नेमक्या की अपेक्षा आहेत ते लक्षात घेवूनच त्या भागाचे प्रसारण केले जाते.

डिसेंबर 2021 च्या ‘ मन की बात ̓मध्ये पंतप्रधानांनी ‘ स्क्रीन टाईम ̓ जास्तच (Mann Ki Baat) वाढत चालल्याचं सांगत पुस्तक वाचन वाढणं गरजेचं असल्याचा सल्ला दिला होता. पुस्तकं – ग्रंथ काही फक्त ज्ञान देतात असं नाही तर माणसाचं व्यक्तिमत्व घडवण्याचं, आयुष्याला आकार देण्याच काम करतात. वाचनामुळे एका अवर्णनीय आनंदाची अनुभूती मिळते’ असं त्यांनी म्हंटल होते. 2022 हे वर्ष भारतासाठी खास होतं कारण यावर्षी भारताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. तसेच पंतप्रधानांनी म्हंटल्याप्रमाणे भारताला G – 20 गटाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही मिळाली.

‘मन की बात’ कार्यक्रमाने देशाच्या नागरिकांमध्ये सामुहिक उत्सुकतेचे वातावरण निर्माण केले आहे. ‘ मन की बात ̓च्या विविध भागांमध्ये युवा वर्गाला प्रेरणा देण्यासाठी, त्यांना जागृत करण्यासाठी थेट तरुण पिढीला साद घालत ‘सबका प्रयास ̓ अर्थात सर्वांनी प्रयत्न करण्याची भावना रुजविली. आपल्या कार्यक्रमामधून मोदी यांनी नेहमीच देशवासीयांना राष्ट्रीय विकासात योगदान देण्यासाठी सतत प्रेरणा देत असतात.

अशाच एका कार्यक्रमामध्ये ते पुण्यातील चंद्रकांत कुलकर्णी यांच्या कामगिरीचा उल्लेख करतात. कुलकर्णी यांचे कार्य अनेक करचुकवेगिरी करणाऱ्यांना प्रेरित कृरण्यासारखे आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांची पेन्शन 16 हजार रुपये आहे. त्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून त्यांना मिळणाऱ्या पेन्शनपैकी दरमहा 5 हजार रुपये स्वच्छ भारत अभियानासाठी देण्याची इच्छा व्यक्त केली. 52 पोस्ट डेटेड चेकही सोबत पाठवून दिले. हीच लोकशाहीची खरी ताकद आहे.

आकाशवाणीने केलेल्या एका सर्वेक्षणातून असं आढळून आले की समाजामध्ये सकारात्मक भावना वाढीस लावण्यामध्ये ‘ मन की बात ̓ चं मोठं योगदान आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन उभं राहण्यासाठी प्रोत्साहन मिळालं आहे. ‘ मन कि बात ̓ मुळे व्हालंटेरिझम म्हणजेच स्वेच्छेने पुढं होऊन काही करण्याची भावना वाढीस लागली आहे, समाजसेवेसाठी लोकं आता मोठ्या उत्साहानं स्वतःहून पुढं येत आहेत.

असे परिवर्तन घडून आलं आहे. गेल्या दशकभरात पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. महामारीच्या काळात मोदी यांनी मन की बात मधून भारताला स्वयंपूर्ण राष्ट्र आणि जागतिक स्तरावर समर्थ आर्थिक सत्ता बनण्याचा आग्रह केला होता. ते कोविड -19 या महामारीमध्ये अभूतपूर्व आव्हान समोर असताना भारताने स्वतःच्या आणि जगाच्या जनतेच्या कल्याणासाठी स्वदेशी लस तयार करून सिद्ध केले.

मन की बात हे स्टार्ट अप इंडिया मोहिमेला तसेच भारतातील तरुणांमध्ये नवकल्पना आणि उद्योजकतेला चालना देणारे उत्कृष्ट व्यासपीठ ठरले आहे. देशातील डिजीटल क्रांती या माध्यमातूनच मोठया प्रमाणावर लोकप्रिय झाली. 26 मार्च 2023 रोजी प्रसारित झालेल्या 99 व्या भागात मोदी यांनी बंगालच्या मच्छीमारांशी संवाद साधला. याद्वारे त्यांनी त्यांच्या समोरील आव्हाने समजून घेण्याचा आणि त्यांच्या समस्या ऐकण्याचा त्यांचा उद्देश होता. बंगालमधील मच्छीमार समुदाय हा त्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा एक आवश्यक भाग आहे. आणि अनेक लोकांच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतो. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या जीवनातील अंतदृष्टि मिळवण्याचा आणि त्यांना दार रोज भेडसावणाऱ्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून मोदी यांनी केला.

‘मन कि बात ̓मुळे देश परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. घराघरात स्वच्छतेचे ‘सदिच्छा दूत ̓ निर्माण झाले आहेत. ‘सेल्फी विथ डॉटर ̓ सारखी मोहीम हरियाणा राज्यातल्या एका लहानशा गावात सुरु होऊन संपूर्ण देशात नाही तर परदेशातही पसरली. एवढं परिवर्तन कोणत्याच सरकारच्या काळात झालं नाही. ‘मन कि बात ̓ काही सरकारी बात नाही हि समाजाची गोष्ट आहे. भारताचा मूळ प्राण राजकारण किंवा राजशक्ती नाही तर समाजकारण आणि समाजशक्ती आहे. आपली कला, साहित्य आणि संस्कृती हे नव्या भारताच्या रचनेचे आधारस्तंभ आहेत हे ओळखून मोदीजींनी हे आधारस्तंभ पुन्हा उभारण्याकरीता अनेक उपक्रम हाती घेतले. जागतिक नेत्याची भूमिका बजावतांना देशाचा अस्सल प्रतिनिधी म्हणून ‘ वसुधैव कुटूंबकम् ‘ या संकल्पनेला जागतिक स्तरावर चालना दिली आहे.

Pune : जिल्ह्यात 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

‘मन की बात ̓ चा प्रत्येक भाग हा सखोल अंतदृष्टि दर्शविणारा, खूप माहितीपूर्ण, सकारात्मक कथांचा आणि सामान्य लोकांच्या चांगल्या कामांची दखल घेणारा असतो. या कार्यक्रमामध्ये अनेक विषयांची चर्चा करण्यात आलीये. त्यापैकी अनेक विषय प्रसार माध्यमांनीही उचलून धरले. स्वछता रस्ते सुरक्षा, अंमली पदार्थ मुक्त भारत, सेल्फी विथ डॉटर यासारखे अनेक विषयांवर नवनवीन संकल्पना तयार करून त्याला एखाद्या अभियानाचे स्वरूप देऊन प्रसार माध्यमांनी त्या क्षेत्रात भरपूर काम केले. दूरचित्रवाणी वाहिन्यांनी या कार्यक्रमाला मोस्ट वॉचड् रेडिओ प्रोग्राम बनवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.