Theur : अंगारकी चतुर्थी निमित्त थेऊर मध्ये चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज :  नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थीला अंगारक योग आला आहे. थंडीचा कडाका असून ही पहाटे पासून आबालवृद्ध भाविकांनी अंगारकी चतुर्थीच्या (Theur) निमित्ताने थेऊर येथील श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

पहाटे मकरंद आगलावे यांनी श्रींची पूजा केली. चिंचवड ट्रस्ट च्या वतीने श्रींची महापूजा करण्यात आली.यावेळी देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त ह भ प आनंद महाराज तांबे उपस्थित होते.भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन  देवस्थान च्या वतीने मंदिर प्रांगणात मोठे मंडप घातले होते.तसेच मंदीरा भोवती संपूर्ण दर्शनबारी  बांधण्यात आली होती.उन्हामुळे भाविकांना त्रास होऊ नये याकरीता भाविकांच्या पाया खाली पायघटणा ची व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थान व आगलावे बंधूंच्या वतीने भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.

Pimpri News : कष्टकरी संघर्ष महासंघाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव

देवस्थान कडून स्त्री पुरुषां करीता सुसज्ज  स्वच्छता गृहाची सोय केली होती. दुपारी भाविकांना खिचडी व चिवडा वाटण्यात आला. या चतुर्थी पासून प्रथमच शेमारु कंपनी सहकार्याने यु ट्युबच्या माध्यमातून भाविकांना घर बसल्या लाईव्ह श्री चिंतामणीच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी ह भ प शिवाजी महाराज यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.चंद्रोदया नंतर श्रींचा छबिना निघणार आहे.त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी ग्रामस्थां तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत मार्फत पार्किंग व्यवस्था व्यवस्थित पणे करण्यात आली होती.लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली (Theur) पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख व त्यांच्या सहकार्याने मंदिर ,परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सर्व व्यवस्थेवर विश्वस्त ह भ प आनंद महाराज तांबे लक्ष ठेवून होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.