Pimpri News : कष्टकरी संघर्ष महासंघाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव

एमपीसी न्यूज –  संस्कार प्रतिष्ठान तर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त  सुमारे 37 हजार सभासद असलेल्या  कष्टकरी संघर्ष महासंघाला यावर्षीचा कामगार (Pimpri News) रत्न संघटना पुरस्कार देण्यात आला. संघाचे अध्यक्ष, कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज ईळवे, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांच्या हस्ते  पुरस्कार  स्वीकारला.

यावेळी अभिनेत्री  मोहिनी कुडेकर, विश्वेश्वर मंडळाचे महेश कलाल, टाटा मोटर्सचे अशोक माने, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, महिला अध्यक्ष माधुरी जलमुलवार, क्रांती महासंघाच्या महिला अध्यक्ष  वृषाली पाटणे,अरुणा सुतार,मुमताज शेख, सीमा जगताप, लता गोरे, रेखा शिंदे, सुमित्रा जयस्वाल,संगीता कांबळे,अर्चना कांबळे, सुनीता पोतदार, जरिता वाटोरे, नंदा तेलगोटे, निरंजन लोखंडे, महादेव गायकवाड, तुकाराम माने,आबा शेलार, फरिद शेख, मनोज यादव,नाना कसबे यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hinjawadi Crime : लग्नसमारंभात चोरीला गेलेले 26 लाखांचे दागिने जप्त

संस्कार प्रतिष्ठान  तर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त  दरवर्षी संस्कार जत्रा भरवण्यात येते. यात दरवर्षी राज्यभरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तव्यदक्ष व्यक्तींचा संस्थांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी सुमारे 37 हजार सभासद असलेल्या  कष्टकरी संघर्ष  महासंघाची यावर्षीच्या कामगार रत्न  संघटना पुरस्कारासाठी निवड केली. कामगार आयुक्त रविराज ईळवे यांनी संस्कार प्रतिष्ठानचे कार्याबद्दल कौतुक करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. असे पुरस्कार सोहळे आणि काम करणाऱ्या  संघटनांचा गौरव होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.  शिवाजीराव खटकाळे यांनी कामगार हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून कामगार चळवळ टिकली पाहिजे असे मत व्यक्त केले.

काशिनाथ नखाते यांनी सर्व कष्टकरी कामगार बांधावासह  हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराला उत्तर देताना म्हणाले की संघटनेच्या माध्यमातून बांधकाम कामगार,फेरीवाला, रिक्षाचालक, घरेलू कामगार,वाहन चालक , सफाई कामगार आदी कष्टकरी कामगारांनी संघटनेवर  मोठा विश्वास दाखवला.(Pimpri News) त्यामुळेच  आपण हे मोठे काम करू शकलो. हजारोच्या संख्येने कष्टकरी कामगार संघटनेसोबत जोडले आणि आपले प्रश्नमार्गी लागण्याचे मार्ग सुरू झाले. पुरस्काराने जबाबदारी तर वाढतेच परंतु कार्याला खूप मोठी प्रेरणा मिळत असते.  महाराष्ट्रभर काम मोठ्या जोमाने करून राज्यातील कष्टकरी कामगारांना दिलासा देण्याचे  काम नक्कीच करण्याचा प्रयत्न या पुढच्या कालावधीमध्ये राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.