Ravet Crime News :गॅस एजन्सीतील कामगाराने केला 35 लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज – गॅस एजन्सीत काम करणाऱ्या कामगाराने दुकानात येणारी रक्कम दुकान मालकाला न देता ती थेट स्वतःच्या व घरच्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करत 35 लाख रुपयांचा (Ravet Crime News) अपहार केला आहे. हा अपहार 20 फेब्रुवारी 2021 ते 29 नोव्हेंबर 2022 या कालावधीत रावेत येथील ओवी भारत गॅस एजन्सी येथे घडला आहे.

याप्रकरणी एजन्सी मालक निलेश चंद्रकांत डोके (वय 45 रा.चिंचवडगाव) यांनी सोमवारी (दि.9) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून श्रवणकुमार मोहनराम मांजू (रा.जांभे,मुळ -राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Hinjawadi Crime : लग्नसमारंभात चोरीला गेलेले 26 लाखांचे दागिने जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या गॅस एजन्सीमध्ये आरोपी काम करत होता. त्याला सिलेंडर तसेच इतर गॅसचे सामान विक्रीचे पैसे तसेच ऑनलाईन पेमेंटचे पैसे एजन्सीच्या खात्यात टाकण्यास सांगितले होते. तरीही आरोपीने रोज ग्राहकांकडून येणारे पैसे एजन्सीला न देता ते परस्पर स्वतःच्या खात्यावर, भाऊ हेताराम याच्या खात्यावर तसेच पत्नीच्या खात्यावर ट्रान्सफर केले. असे त्याने दिड-दोन वर्षात तब्बल 35 लाख रुपये हडपले. यावरून मांजू यांच्यावर रावेत पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस (Ravet Crime News) पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.