Dehu : श्रीक्षेत्र देहू ते पंढरपूर आनंदवारीत आनंदडोह नाट्यप्रयोगाचे पालखी मार्गावर विविध ठिकाणी होणार सादरीकरण

एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र देहूहून (Dehu) पंढरपूरला जाणाऱ्या वारीसोबत यंदा जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकारामांचे जीवनचरित्र एकपात्री प्रयोगातून सादर करण्याचा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज 338 व्या पालखी सोहळ्यानिमित्त संवाद, पुणे व सावित्रीबाई फुले विद्यापीठ – राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांतर्गत श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र पंढरपूर वारीच्या मार्गावर जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचे दर्शन घडविणारा, अभिनेते योगेश सोमण यांच्या समर्थ अभिनयातून साकारणारा एकपात्री नाट्यप्रयोग ‘आनंदडोह’चे एकूण 15  प्रयोग होणार आहेत.

 

Pune : जाणून घ्या पालखी सोहळ्यात पुण्यात कशी असेल वाहतूक व्यवस्था…

 

या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन देहूतील (Dehu) सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल येथे 9 जून  रोजी सायंकाळी साडे पाच वाजता संपन्न होईल. शुभारंभाच्या पहिल्या प्रयोगाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी संत साहित्याचे गाढे अभ्यासक व घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे हे असतील.

तसेच मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री  संजय भेगडे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष  बाळासाहेब काशीद, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष  हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, पालखी सोहळा प्रमुख हभप संजय महाराज मोरे, हभप भानुदासमहाराज मोरे, हभप अजय महाराज मोरे तसेच संत साहित्याचे अभ्यासक हभप पंकजमहाराज गावडे व हभप सचिन महाराज पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रमुख संयोजक संवाद, पुणेचे अध्यक्ष  सुनील महाजन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रसेवा योजनेचे सल्लागार  राजेश पांडे व या पहिल्या प्रयोगाचे निमंत्रक, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, सचिव प्रा. विकास कंद आणि शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी दिली.‌

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.