Sangvi : रस्त्यावरील सीसीटीव्हीच्या 68 बॅट-या चोरीला,अज्ञातावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जुनी सांगवी, पिंपळे सौदागर परिसरातील रस्त्यावर (Sangvi) लावलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यांच्या 68 बॅट-या अज्ञातांनी चोरून नेल्या. हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत घडला.

सुहास सुरेश केसकर (वय 49, रा. रावेत) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Hinjawadi : रेस्टॉरंटमधील स्मोकिंग झोनमध्ये मुलांच्या प्रवेशास आक्षेप घेतल्याने टोळक्याकडून एकाला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी, पिंपळे सौदागर परिसरात रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यासाठी सीसीटीव्ही जंक्शन बॉक्समध्ये बॅटरी संच देखील लावण्यात आले आहेत. अज्ञातांनी वर्षभराच्या कालावधीत परिसरातील ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही जंक्शन बॉक्सचे लॉक तोडून त्यातून एकूण 68 बॅट-या आणि 11 लिंकसेट असा एकूण एक लाख 90 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.