PCMC News : थकीत कर वसुलीसाठी अभय योजना जाहीर करा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कर थकविणाऱ्या मिळकत धारकांना जप्तीच्या नोटिसा बजावून मिळकतींना सिल ठोकले जात आहे. (PCMC News) जबरदस्तीने होणारी वसुली महापालिकेने तत्काळ थांबवावी आणि थकित कर वसुलीसाठी अभय योजना राबवावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड मिळकतधारक संघटनेकडून करण्यात आली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेऊन मिळकतधारक संघटनेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, सोमनाथ मंडलिक, महादेव तांबे यांनी निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन वर्षांपूर्वीच्या करोनामुळे आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. या परिस्थितीमध्ये अडकलेल्या शहरातील करदात्यांकडील थकित मिळकत कर वसुलीसाठी पालिकेने जबरदस्तीने वसुली सुरू केली आहे. जप्तीच्या नोटिसा बजावून नागरिकांच्या मिळकतींना सिल केल्या जात आहेत.

Nigdi News : निगडी येथील गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

महापालिक पालिका स्थानिक स्वराज्य संस्था असून नागरिकांना सुविधांसाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे वसुलीचा ही पध्दत थांबवावी. (PCMC News) तसेच, थकबाकी वसुलीसाठी अभय योजना जाहीर करावी. यामध्ये अतिरिक्त आकारलेली शिक्षण फी, नोटीस फी, मनपा शास्ती (दंड) 100 टक्के रद्द करून दोन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण थकित रक्कम भरण्याची वाजवी संधी देणारा दिलासादायक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.