Pune : पुणे शहरातील काँग्रेस ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या ब्लॉक अध्यक्षांना पुणे शहरा अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी नियुक्तीची पत्र देण्यात आले.

Alandi : मुलीच्या वाढदिवसानिमित्त राळे कुटूंबियांच्या वतीने वारकरी शिक्षण संस्थेस जीवनावश्यक वस्तू सुपूर्द
महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, लता राजगुरू, दत्ता बहिरट, संगीता तिवारी, कमल व्यावहारे, बाळासाहेब दाभेकर, मुख्तार शेख, मेहबुब नदाफ, हनुमंत पवार आदी मान्यवरांसोबत सर्व जुने ब्लॉक अध्यक्ष व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येरवडा ब्लॉक – रमेश सकट, मार्केट यार्ड ब्लॉक – रमेश सोनकांबळे, भवानी ब्लॉक – सुजित यादव, पुणे कॅन्टोमेंन्ट – आसिफ शेख, शिवाजीनगर ब्लॉक – अजित जाधव, पर्वती ब्लॉक – संतोष पाटोळे, हडपसर ब्लॉक – बळिराम डोळे, बोपोडी ब्लॉक – विशाल जाधव, पं. नेहरू स्टेडियम ब्लॉक – हेमेंत राजभोज, कोथरूड ब्लॉक – रविंद्र माझीरे, कसबा ब्लॉक – अक्षय माने आदींना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.

 

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, मागील ८ ते १० वर्षांपासून ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. जयपूर अधिवेशनामध्ये ५ वर्षांपेक्षा अधिक पदांवर असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होऊन नविन पदाधिकारी नेमणुकीचा ठराव त्यावेळी करण्यात आला होता.

 

त्यानुसार आज काँग्रेस भवन येथे ह्या नियुक्त्या करण्यात आल्या. तसेच सर्व नवनियुक्त अध्यक्षांकडून आगामी लोकसभा,विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठी जबाबदारी असल्याचे शहराध्यक्षांनी यावेळी त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.