Pune Crime News : घर खाली करण्यावरून वाद,भाडेकरू आणि घरमालकाचे एकमेकांवर खुनी हल्ल्याचे आरोप

एमपीसी न्यूज – घर खाली करण्यावरून वाद झाल्यानंतर भाडेकरू आणि घरमालक यांच्यात भांडण झाले. याच भांडणाच्या रागातून दोघांनीही एकमेकांवर चाकूने हल्ला केला. हडपसर येथील काळे बोराटेनगर परिसरात 17 जुलै रोजी हा प्रकार घडला. भाडेकरु सौरभ अशोक फासगे आणि घरमालक अक्षय गणेश काळे (Pune Crime News) यांनी एकमेकांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

 

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सौरभ फासगे हा अक्षय गणेश काळे यांच्याकडे भाडेकरु म्हणून राहायला होता. सौरभ फासगे याला अक्षय काळे यांनी रूम खाली करण्यासाठी सांगितले. याच गोष्टीचा राग आल्याने सौरभने धारदार चाकूसारख्या हत्याराने  हल्ला केल्याचा आरोप अक्षय काळे यांनी केलाय.

 

 

Pune Crime News : मुलीला शाळेत सोडवण्यासाठी जात असताना दुचाकीला ट्रकची धडक, बाप-लेकीचा जागीच मृत्यू

 

 

तर दुसरीकडे सौरभ फासगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची नवी मुंबईत बदली झाल्याने ते घराचे भाडे व डिपॉझिट मागण्यासाठी गेले होते. यावेळी फिर्यादी आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी हातातील चाकूने (Pune Crime News)  फिर्यादींना खाली पाडून त्यांच्या डोक्यात वार केल्याचे सांगितले. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.