Manikbagh : माणिकबाग येथील खाऊगल्लीत सिलेंडरचा स्फोट

एमपीसी न्यूज – माणिकबाग (Manikbagh) येथील गोयलगंगा परिसरातील खाऊ गल्लीत सिलेंडरचा स्फोट झाला आहे.ही घटना आज (मंगळवारी) सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडली.

 

 

Pune Crime News : आमदार माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे आणि श्वेता महाले यांची पुण्यात फसवणूक

 

 

माणिकबाग येथील सिंहगड रस्ता येथील खाऊगल्लीतील प्रेमाचा चहा अमृततुल्यमध्ये सकाळी एका सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. चहा बनविण्याचे काम सुरु होते. यावेळी गॅस गळती झाल्याने हा स्फोट झाला. या स्फोटात सिलेंडरच्या (Manikbagh) अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत. स्फोटाच्या आवाजाने परिसरात काही काळ भितीचे वातावरण होते. बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही व कोणी जखमीही झालेले नाही.यावेळी आसपासच्या दुकानांनाही आगीची झळ लागली.

Katraj News : पुणे शहरातील काही भागाचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद  

 

अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी पोहोचली असून आठ जवानांनी आग आटोक्यात आणली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.