Katraj News : पुणे शहरातील काही भागाचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद  

एमपीसी न्यूज –  पुणे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद असणार आहे. पाणी पुरवठा बंद (Katraj News)  असणारा भाग वडगाव जलकेंद्र परिसरातील आहे.

 

Pavana Dam: पवना धरणातील पाणीसाठा 67.80 टक्के पाणीसाठा

 

वडगांव, कात्रज, धनकवडी, भारती विद्यापीठ परिसर, धायरी, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव पठार, हिंगणे, आनंदनगर इत्यादी भागात पाणीपुरवठा बंद असेल. गुरुवारी (दि.21) तातडीची देखभाल (Katraj News) दुरुस्तीची काम असल्यामुळे पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. 22) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.