Pune Crime News : पुण्यात ई बाईकच्या शोरूमला आग, सात बाईक जळून खाक

एमपीसी न्यूज – पुण्यातील गंगाधाम चौकातील देवल ई बाईकच्या शोरूमला सोमवारी (दि. 18) रात्री आठच्या सुमारास आग  लागली.यामध्ये शरुममधील सात ई बाईक जळून (Pune Crime News)  खाक झाल्या आहेत.

 

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या हेड क्वार्टर, कोंढवा व भवानीपेठ अग्निशामक दलाच्या केंद्राकडून चार गाड्या व एक टँकर घटनासथळी दाखल झाले होते. याविषयी अग्निशामक दलाचे अधिकारी प्रदिप खेडेकर (Pune Crime News) यांनी दिलेल्या माहितीनुसार,या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नसून शोरूममधील बाईक व इतर सामान मात्र जळून खाक झाले आहे. आगीचे कारण कळू शकलेले नाही. मात्र शरूमध्ये बाईकची चार्जिंग सुरू होती. चार्चींगचे पोर्ट किंवा चार्जर गरम होऊन आगीला कारण ठरले असल्याची शक्यता आहे.

 ही कारवाई अग्निशामक दलाचे जवान प्रदिप खेडेकर, सचिन मांडवकर,चंद्रकांत गावडे, मनीष बोंबले, अनिल गायकवाड आदींनी केली.

 

 

 

ई बाईक शोरूमला नियमांची गरज

ई बाईक चालवताना किंवा त्यांची विक्री करत असताना अद्याप तर इतर वाहानांप्रमाणे शासन किंवा वाहतूक विभागाकडून कोणतेही नियम आखले गेलेले नाहीत. त्यामुळे अगदी 200 ते 300 स्क्वेअर फीट (Pune Crime News) जागेत ही शोरुम बनवले जातात. त्यासाठी कोणत्या परवान्याची गरज नसते. अशा दुर्घटना टाळण्यासाठी वेळीच ई-बाईक विक्रासाठी योग्य नियमावली बनवणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.