Pune Crime News : आमदार माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे आणि श्वेता महाले यांची पुण्यात फसवणूक

एमपीसी न्यूज – विधानसभेतील विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, साकोरे देवी आणि देवयानी फरांदे आणि श्वेता महाले यांची फसवणूक करण्यात आली. एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर (Pune Crime News) संपर्क साधून आईच्या आजारपणासाठी पैसे मागितले आणि फसवणूक केली. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश राठोड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पूजा सतीश मिसाळ यांनी तक्रार दिली आहे. 

 

 

Pavana Dam: पवना धरणातील पाणीसाठा 67.80 टक्के पाणीसाठा

 

 

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या माधुरी मिसाळ यांची मुलगी आहे. अज्ञात आरोपीने माधुरी मिसाळ यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्याच्या आईला बाणेर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे सांगितले. यासाठी काही पैशाची गरज असून माधुरी मिसाळ यांना गुगल पेवर 3400 पाठवण्यास सांगितले. माधुरी मिसाळ (Pune Crime News) यांच्यासोबत त्यांच्या सहकारी असलेल्या मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे आणि श्वेता महाले यांनी देखील त्यांच्या गुगल पेवर पैसे पाठवले.

 

 

दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर समोरील व्यक्तीने आपली फसवणूक  केल्याचे लक्षात आल्यानंतर माधुरी मिसाळ यांची मुलगी पूजा मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.