Kerala : देवभूमीत पावसाचे आगमन; अखेर मान्सून केरळमध्ये दाखल

एमपीसी न्यूज – अंदमान निकोबारच्या बेटांवरून (Kerala) मान्सूनने अखेर केरळ गाठले आहे. केरळच्या बहुतांश भागासह तामिळनाडू राज्यातील काही भागात गुरुवारी (दि. 8) मान्सूनला सुरुवात झाली आहे. 

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1666708529108090880/photo/1

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 4 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळामुळं मॉन्सून लांबला होता. खोळंबलेल्या पेरणी, आटत जाणारे धरणातील पाणी यामुळे सर्वांचेच लक्ष पावसाकडे लागले होते. या बातमीमुळे सारेच सुखावणार आहेत.

पुढील 48 तासांत मॉन्सून केरळचा उर्वरित भाग, कर्नाटक, तामिळनाडूचा (Kerala) काही भाग आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये मॉन्सून सरकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

Chinchwad : बनावट कागदपत्रांच्या आधारे केला बालविवाह; पाच जणांवर गुन्हा दाखल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.