Bhosari News: मुले खेळताना गोंधळ घालतात म्हणून केले शेजारील महिलेवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – मुले अंगणात खेळताना गोंधळ घालताता, त्यांच्या आवाजाने त्रास होतो म्हणून थेट कोयत्यानेच शेजारी राहणाऱ्या महिलेवर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. हा प्रकार रविवारी (दि.11) दुपारी दिघी रोड, भोसरी येथे घडला आहे.

याप्रकरणी महेश आजीनाथ ढेंबरे (वय 25 रा. दिघीरोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सतीष दत्तू डोळस (वय 42 रा.दिघीरोड, भोसरी) याला अटक करण्यात आली आहे.

Nigdi News : वाट्याला आलेल्या दु:खाची चिंता करू नये – ह.भ.प. संदीप मांडके

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची भाची व इतर मुले अंगणात खेळत असताना गोंधळ घालतात, त्यांच्या आवाजाने त्रास होतो याचा राग मनात धरून आरोपीने थेट फिर्यादीच्या घरासमोर आले, हातातील कोयत्याने फिर्यादीच्या आईच्या डोक्यावर, पाठीमागे व पुढे वार करून जीवे मारण्याचा प्रय़त्न केला. यावरून भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.