Nigdi News : वाट्याला आलेल्या दु:खाची चिंता करू नये – ह.भ.प. संदीप मांडके

एमपीसी न्यूज – प्रारब्धभोग भोगल्याशिवाय सुटका (Nigdi News) नाही म्हणून वाट्याला आलेल्या दु:खाची चिंता करू नये!” असे विचार ह.भ.प. संदीप मांडके यांनी पाच दिवसीय नारदीय परंपरेतील कीर्तन महोत्सवात चतुर्थ पुष्पाचे निरूपण करताना व्यक्त केले.

निगडी प्राधिकरण येथील श्रीराम मंदिर, पेठ क्रमांक येथे रविवार (दि.11) मांडके बोलत होते.  यावेळी माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, राजेंद्र बाबर आदी उपस्थित होते.

Pimpri News : सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण नोंदणीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सदासर्वदा प्रीती रामी धरावी |दु:खाची स्वयें सांडी जीवी करावी | देहे दु:ख ते सुख मानीत जावे | विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ||”या समर्थ रामदासस्वामी यांच्या श्लोकावर निरूपण करताना संदीप मांडके यांनी, “मानवी संबंधातील प्रीतीमध्ये स्वार्थ असतो; परंतु भगवंतावर केलेली प्रीती मोक्षप्राप्ती देते.(Nigdi News) संतांनी सर्वांवर निष्काम प्रेम केले; कारण सर्व जीव हे भगवंताचेच अंश आहेत, असे गोंदवलेकर महाराज म्हणतात. परमार्थ ही वृद्धावस्थेत करण्याची बाब नव्हे!” असे सांगून पूर्वरंगात त्यांनी शांतिब्रह्म एकनाथमहाराज यांच्या सोशीकतेची अन् औदार्याची कथा सांगितली; तर कीर्तनाच्या उत्तररंगात राम वनवासाचे आख्यान कथन केले.

निरूपणा ची मिश्कील शैली आणि त्याला प्रसंगोचित पदाचे सुरेल सादरीकरण यामुळे संदीप मांडके यांनी श्रोत्यांना हसवता हसवता अंतर्मुख केले. कानिफनाथ घैसास (तबला) आणि धनवर्षा प्रभुणे (संवादिनी) यांनी साथसंगत केली. श्रीराम मंदिर विश्वस्त मंडळाने संयोजनात सहकार्य केले. संजय दातार यांनी सूत्रसंचालन केले. सामुदायिक आरतीने चतुर्थपुष्पाचा समारोप करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.