Chinchwad : चिंचवडला महिलांचे अथर्वशीर्ष पठण

73

एमपीसी न्यूज -‘ओम् नमस्ते गणपतये… गजानना, गजानना…ओम गं गणपतये नम:… मोरया, मोरया…’ च्या जयघोषाने शेकडो महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले.

HB_POST_INPOST_R_A

संस्कृती संवर्धन व विकास महासंघ व चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने हजारो स्त्री-पुरुषांच्या उपस्थितीत सामुदायिक अथर्वशीर्षपठण करण्यात आले. गणेश नामाचा जयघोष करीत ऋषीपंचमीनिमित्त आयोजित हजारो महिलांची उपस्थिती होती.

चिंचवड येथील मंगलमूर्तीवाड्यात सकाळी हे अथर्वशीर्ष पठण झाले. यावेळी नगरसेवक सुरेश भोईर,  संस्कृती संवर्धन विकास महासंघाचे मुंबई येथील सुवर्णा देव,  माजी नगरसेविका नंदा ताकवणे,  माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे हे उपस्थित होते. अथर्वशीर्ष पठण सागर दाणी, भक्ती देव,  नितीन शिंदे आदींनी केले. डॉ. अजित जगताप यांनी ओमकार व गायत्री मंत्राने सुरुवात केली. अच्युत होनप, शिरीष देशपांडे, विकास देशपांडे आदींनी संयोजन केले.

सूत्रसंचालन हभप किसन महाराज चौधरी यांनी केले.  प्रास्ताविक रवीकांत कळंबकर यांनी केले.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: