Pimpri : एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद

अजितदादा चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धा
 
एमपीसी न्यूज – अजितदादा चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी संघाने क्रिडा प्रबोधिनी संघाचा 4-1 असा सहज पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर पिंपरी येथे झालेल्या या स्पर्धेत एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी संघाने क्रिडा प्रबोधिनी संघाचा 4-1 असा सहज पराभव केला. हर्ष परमार याने 21 व्या मिनिटाला गोल करून एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी संघाचे खाते उघडले. फॉममध्ये असणार्‍या युविराज वाल्मिकी याने चारच मिनिटांनी गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. 39 व्या मिनिटाला आणखी एक गोल करून वाल्मिकीने संघाची 3-0 अशी आघाडी वाढवली. वाल्मिकीने गोलांची हॅट्रीककरून संघाला 4-1 असा विजय मिळवून दिला. क्रिडा प्रबोधिनी संघाकडून रैस मयुवर याने एक गोल केला. 
 
स्पर्धेचे पारितोषिक वितरण विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते आणि आमदार धनंजय मुंडे, माजी खासदार रणजीतसिंग मोहीते पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी युवा संघटनेचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील, रोहीत पवार, नगरसेवक राजु मिसाळ, विशाल शंकर वाकडकर, फिरोज शेख, वैशाली घोडेकर आणि सागर पुजारी यांच्या उपस्थितीत झाले. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकालः अंतिम फेरीः एक्सलन्सी अ‍ॅकॅडमीः 4 (हर्ष परमार 21 मि., युविराज वाल्मिकी 25, 39, 57 मि.) वि.वि. क्रिडा प्रबोधिनीः 1 (रैस मयुवर 35 मि.); हाफ टाईम 2-0;

 
वैयक्तिक पारितोषिकेः 
मालिकेचा खेळाडूः युवराज वाल्मिकी (एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी); 
सर्वोत्कृष्ट रक्षकः रूबेन केदारी (एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी); 
सर्वोत्कृष्ट फॉवर्डः अंनिकेत गुरव (क्रिडा प्रबोधिनी);
सर्वोत्कृष्ट हाफः आशितोष लिंगे (आयकर विभाग संघ);
सर्वोत्कृष्ट गोलरक्षकः जीवन शिंदे (क्रिडा प्रबोधिनी);
शिस्तशीर खेळाडूः तालिब शहा (क्रिडा प्रबोधिनी);

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.