Pimpri: ‘अजितदादांनी ज्यांची जास्त काळजी घेतली, त्यांनीच राष्ट्रवादीला दगा दिला’ – धनंजय मुंडे

राष्ट्रवादीची हवा निर्माण झाली असून गेलेल्यांसाठी आता ‘द एंड

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील असंख्य कार्यकर्ते नेते केले. त्यांना महत्वाची पदे दिली. दादांनी ज्यांची जास्त काळजी घेतली. त्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसला ‘दगा’ दिला आहे. आता राष्ट्रवादीची हवा निर्माण झाली असून गेलेल्यांना परत यावे लागणार आहे. परंतु, पडत्याकाळात सोडून गेलेल्यांसाठी आता ‘द एंड’ आहे, असे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपचे आमदार लक्ष्मण  जगताप आणि महेश लांडगे यांना पुन्हा राष्ट्रवादीत एंट्री नसल्याचे स्पष्ट केले. 

भोसरीतील ‘बूथ सक्षमीकरण मेळाव्या’त मुंडे बोलत होते. अजितदादांनी पुणे, पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालाट केला. सर्वांना सोबत घेऊन शहराचा नियोजनपूर्वक विकास केला. परंतु, एवढा विकास करुनही लोकसभा आणि विधानसभेला पक्षाच्या विरोधात निकाल गेला. ही दुर्धंवी बाब आहे. 

दादांनी शहरातील अनेकांना नेते केले. महत्वाची पदे दिली. परंतु, वातावरण बदलताच दादांनी ज्यांच्यावर जास्त प्रेम केले. अधिक काळजी घेतली, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दगा दिला. लाटेत ‘दामुजी’च्या जोरावर निवडून आले आहेत. आता राष्ट्रवादीची हवा निर्माण झाली असून गेलेल्यांना परत यावे लागणार आहे. परंतु, पडत्या काळात पक्षाला सोडून गेलेल्यांसाठी आता ‘द एंड’ असल्याचे सांगत  भाजपचे आमदार लक्ष्मण  जगताप आणि महेश लांडगे यांना पुन्हा राष्ट्रवादीत एंट्री नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, हल्लाबोल आंदोलनाच्या काळेवीडीतल सभेत देखील धनंजय मुंडे यांनी आमदार जोडगोळीवर जोरदार हल्लाबोल केला होता. विधानसभा निवडणुकीवेळी वेळ बघून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलात. पण जनता तुम्हाला घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ‘देखते है मुख्यमंत्री तुम्हे कितना सांभालता है’ असा टोला त्यांनी आमदारांना लगाविला होता.

"bjp

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.