Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षपदी रो. सदाशिव काळे

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षपदी रो. सदाशिव काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर,सचिवपदी महादेव शेंडकर आणि  प्रकल्प अधिकारीपदी संतोष भालेकर यांची निवड करण्यात आली.

रोटरी क्लब पिंपरी टाऊनचा पदग्रहण समारंभ शनिवारी (दि.21) चिंचवड येथे पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल शैलेश पालेकर, मावळत्या अध्यक्षा वर्षा पांगारे, सचिव सचिव नीताअरोरा आदी उपस्थित होते.  रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनची 2018-19 या पुढील वर्षीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कार्यकारणीमध्ये सचिवपदी  महादेव शेंडकर,  खजिनदार राम भोसले, प्रकल्प अधिकारीपदी संतोष भालेकर, प्रसिद्धीप्रमुख रविंद्र भावे, सदस्य अधिकारी अशोक शिंदे,व्यवस्थापक आनंद सूर्यवंशी, क्रीडा अधिकारी संतोष जाधव,  तांत्रिक विभागप्रमुख हेमंत दोशी,  वैद्यकीय विभागप्रमुखपदी गीता जोशी यांची निवड करण्यात आली.

मावळत्या अध्यक्षा वर्षा पांगारे  यांच्याकडून रो. सदाशिव काळे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी बोलताना नवनियुक्त अध्यक्ष रो. काळे म्हणाले, ”आदिवासी पाड्यावरील नागरिकांचे जीवन सुसाह्य करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गरजू नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. नुकतेच पाड्यावरील शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाण्या-येण्यासाठी 100 रेनकोटचे वाटप करण्यात आले. तसेच  700 वह्यांसह इतर शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. आगामी काळात पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे.  शेतक-यांना साक्षर करण्यावर आपला भर असणार आहे. 

मावळत्या अध्यक्षा वर्षा पांगारे  यांनी गतवर्षी राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार बाळासाहेब उ-हे यांनी मानले.
"bjp

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.