Pune -बाणेर – कोथरूड मधील आरक्षित जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव ?

नागरिकांनी उभी केली ‘आरक्षण बचाव कृती समिती’च्या माध्यमातून जनचळवळ

एमपीसी न्यूज – बाणेर आणि कोथरूड येथील काही भूखंडावर उद्यान, मैदान, अग्निशमन केंद्र, दवाखाना, प्राथमिक शाळा आणि प्रसूती ग्रहाचे आरक्षण आहे. परंतू नगर विकास विभागाने या जागांवरील आरक्षणे उठवण्याचा निर्णय घेतला आहे. नगर विकास विभागाच्या या निर्णयाविरोधात कोथरूड बाणेर भागातील नागरिक आणि राजकीय पक्ष एकत्र आले आहेत.  त्यासाठी कोथरूड आणि बाणेर आरक्षण बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या जागांवरील आरक्षण कायम राहावे याकरिता स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

कोथरूड येथील जवळपास 5 एकर जागा शासन दरबारी आरक्षित असून आता राज्य सरकारने हे आरक्षण उठवून बिल्डरच्या घशात घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. कोथरूड मधील सर्वे नंबर 159/60/167 येथील जागेवरील आरक्षण राज्य सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने जुलै 2018 पासून उठवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

कोथरूडची लोकसंख्या पाहता सदरचे आरक्षण हि कोथरूडच्या नागरिकांची मुलभूत गरज बनली आहे. तर या जागेवरील आरक्षण उठवू नये म्हणून कोथरूडच्या नागरिकांनी एक चळवळ उभी केली आहे. तर महापालिकेचे कर भरणाऱ्या नागरिकांवर शासन गदा आणत असल्याची भावना आता नागरिक व्यक्त करत आहेत.


​​

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.