Kothrud : कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग

एमपीसी न्यूज – कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामात आग लागल्याची (Kothrud) घटना बुधवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाऊण तासात आग आटोक्यात आणली. पौड रस्त्यावरील तुळजाभवानी मंदिराजवळ मंडप साहित्याचे गोदाम आहे. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास गोदामात आग लागली.

Pune : 2023-24 आर्थिक वर्षात पुणे रेल्वे विभागाने कमावले 1213 कोटी रुपयांचे उत्पन्न, उत्पन्नात 18 टक्क्यांनी वाढ

गोदामात बांबू, कापड, सजावट साहित्य ठेवण्यात आले होते. आग लागल्यानंतर सजावट साहित्याने पेट घेतला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या कोथरुड केंद्राला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या कोथरुड, एरंडवणे केंद्रातील पाच बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले.

केंद्रप्रमुख राजेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून अर्धा ते पाऊण तासात आग आटोक्यात आणली. आगीत सजावट साहित्य जळाले असून, आगी मागचे कारण समजू शकले (Kothrud) नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.