Pune : बाणेरला जाण्यासाठीचा पुणे विद्यापीठ चौकातील रस्ता खुला होणार

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील ( Pune) वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. पुणे विद्यापीठ चौकातून बाणेरला जाणारा रस्ता आजपासून (दि. 15 )खुला होणार आहे. त्यामुळे या चौकात होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होणार आहे.

पुणे विद्यापीठ चौक परिसरात मेट्रो आणि रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. सप्टेंबर महिन्यापासून बाणेर रस्त्याने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. या रस्त्यावरील काही कामे पूर्ण झाल्याने बाणेरकडे जाणारा रस्ता खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे बाणेरकडे जाणाऱ्या वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Today’s Horoscope 15 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

तसेच, शिवाजीनगर येथून विद्यापीठाच्या पुढे पाषाणकडे जाण्यासाठी आनंद ऋषिजी महाराज चौकातील पिलरच्या अगोदर डाव्या बाजूच्या स्वतंत्र मार्गिकेचा (लेन) वापर करावा. बाणेरला जाण्यासाठी बाणेर रस्त्याच्या डाव्या मार्गिकेमधून जावे.

तसेच, पाषाण येथून विद्यापीठासमोरील आनंद ऋषिजी महाराज चौकाकडे येण्यासाठी पूर्वीप्रमाणेच अभिमानश्री सोसायटी जंक्शन पाषाण रस्ता येथून डावीकडे वळून बाणेर रस्त्याने सकाळनगरमार्गे येता येईल, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे ( Pune) यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.