Today’s Horoscope 15 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 15 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – सोमवार

तारीख 15.01.2024.

शुभाशुभ विचार – आनंदी दिवस.

आज विशेष – मकर संक्रांति.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – शतकारका 08.04 पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा.

चंद्र राशी – कुंभ.

—————————–

मेष – ( शुभ रंग – हिरवा)

कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणारी कामे तुम्ही सहजच कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक असेल. आज तुम्हाला थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते.

वृषभ – ( शुभ रंग- निळा)

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. आज कायद्याची चौकट मोडू नका.

मिथुन – ( शुभ रंग- राखाडी)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. अधिकारांचा वापर जपूनच करा. उपासनेत मात्र खंड नको.

कर्क – ( शुभ रंग – क्रीम)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. आज तब्येतही थोडी नरमच राहील. पती-पत्नी मधील वादावर मौन हा रामबाण उपाय राहील.

सिंह – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. पत्नीच आज तुम्हाला योग्य सल्ले देईल.

कन्या – ( शुभ रंग- जांभळा)

 आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशिने पुरवाल. आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी एखादी कामगिरी कराल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष द्यायला हवे.

तूळ – ( शुभ रंग- पिस्ता)

नोकरदारांना आज वरिष्ठांच्या मागे पुढे करावेच लागेल. नवोदित कलाकारांना यशाची चाहूल लागेल. रुग्णांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल प्रसन्न दिवस.

वृश्चिक – ( शुभ रंग – केशरी)

एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज बरेच भटकावे लागेल. गृहिणी शेजार धर्म पाळतील. जवळपासचे प्रवासात झालेल्या काही ओळखी व्यवसाय वृद्धीसाठी फायदेशीर ठरतील.

धनु – (शुभ रंग- लाल)

बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या घरगुती कामात आज लक्ष घालाल. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. विद्यार्थ्यांना आज अभ्यास कंटाळवाणा वाटेल.

मकर – ( शुभ रंग – क्रीम)

आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. वाणित मृदुता ठेवून अनेक किचकट प्रश्न मार्गी लावाल.

कुंभ – (शुभ रंग- आकाशी)

आजचा दिवस तुमच्यासाठी लाभाचा आहे. आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील.

किरकोळ कारणामुळे दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील.

मीन – ( शुभ रंग- मोतिया)

नवीन व्यवसायात आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. ज्येष्ठ मंडळींनी आज हाती असलेली पुंजी जपून वापरावी. सत्संगातून आज मनशांती मिळेल.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.