Bavdhan Crime News : लग्नात मानपान केला नाही म्हणून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी लग्नात मानपान केला नाही यावरून सासरच्या तिघांनी मिळून विवाहितेचा छळ केला. मुलाच्या वाढदिवसासाठी आलेल्या विवाहितेच्या आई आणि इतर नातेवाईकांना सासूने भांडण करून हाकलून लावले.

याबाबत पती आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 नोव्हेंबर 2017 पासून 15 डिसेंबर 2020 या कालावधीत बावधन येथे घडली.

केतन संजय वाधवणे, कल्पना संजय वाधवणे, संजय सुधाकर वाधवणे (सर्व रा. बावधन) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी विवाहितेच्या लग्नात तिच्या सासरच्या लोकांचा मानपान केला नाही, तसेच घरातील काम नीट करत नाही असे म्हणत पती, सासू आणि सासरे यांनी विवाहितेला उपाशी ठेऊन वेळोवेळी मारहाण करून तिचा छळ केला.

नऊ डिसेंबर रोजी फिर्यादी महिलेच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यासाठी विवाहितेची आई आणि इतर नातेवाईक आले होते. त्यांना जेवण बनविण्यासाठी विवाहितेने सासूकडे भांडे आणि अन्न मागितले असता सासूने विवाहितेला, तिच्या आईला शिवीगाळ करून मारहाण करत घराच्या बाहेर हाकलून काढले.

10 डिसेंबर रोजी पुन्हा किरकोळ कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.