Pimpri : शुल्लक कारणावरून कोयत्याने मारहाण, परस्पर विरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – निरशा मिशा ही फुटलेल्या नसतात मात्र तरुणांना गर्लफ्रेंड हव्या असतात…बर प्रकरण एवढच असत तरी ठीक आहे पण तिच्या किंवा तिच्या मैत्रीणी समोर शायनिंगसाठी त्यांना स्टंट करायचे, त्यांचे इगो हर्ट होतात मग त्यातून एखाद्यावर वार जरी केले तरी त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. चार-दोन मुलामुली मागे अशी प्रकरण होताना सर्रास दिसतात. पिंपरीत (Pimpri) ही केवळ तुझी मैत्रीण तिच्या मैत्रिणीला मला बोलू देत नाही म्हणत एकमेकांना कोयत्याने मारहाण केली आहे. हि घटना पिंपरीतील मोहननगर येथे शनिवारी (दि.10) रात्री घडली.

Pimpri : आता भीमजयंती साजरी करण्यासाठी मराठा समाज पाठीशी उभा राहणार- ॲड लक्ष्मण रानवडे

याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले असून पहिल्या तक्रारीत सतिश रमेश भडकवाड (वय 18 रा. चिंचवड) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आसिफ (वय अंदाजे 20) व साहिल जानराव (वय 18 रा. मोरवाडी, पिंपरी Pimpri ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मित्र तक्षक चंद्रकांत बोराडे याला आरोपींनी फोन करून बोलावून घेतले.

त्याच्याक़डे आसिफ याने तुजी एक मैत्रीण तिच्या मैत्रिणीला माझ्या सोबत राहू नको असे सांगत आहे तिला समजावून सांग म्हणत तक्षक याला शिवीगाळ करत कोयत्याने मारहाण केली. यात फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही मारहाण करत जमी केले.

तर दुसऱ्या तक्रारीत अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली असून सतीष रमेश भाडकवार, चिकू व इतर दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मित्राला बोलत थांबलेला असताना फिर्यादीला आरोपींनी काहीही कारण नसताना मारहाण केली व कोत्याने मारहाण करत जखमी केले.

कारण तसे खूप किरकोळ आहे मात्र या कारणासाठी कोयत्याने मारहाण व त्यामुळे तरुण वयात दाखल होणारे गुन्हे ही गंभीर बाब आहे. अद्याप कोणालाही अटक झाली नसून पिंपरी (Pimpri) पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.