Pavan Maval : पवन मावळातील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – पवन मावळातील (Pavan Maval) अनेक गावांना जोडणारा रस्त्याचे डांबरीकरण, रुंदीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून साडेचार कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या रस्त्याच्या कामाचा बुधवार (दि.१७) भूमिपूजन समारंभ झाला.

विशेष रस्ते दुरुस्ती योजनेअंतर्गत मौजे कासारसाई–पाचाणे- पुसाणे- ओव्हळे प्रजिमा १५७ किमी ००० ते ३  किमी १० ते १०/५०० व किमी १३/७०० ते २० रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करण्यात येणार असून यामध्ये पाचाणे फाटा ते डोणे फाटा येथील सुमारे चार किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.

Swargate : वाहन चालकांकडून पैसे घेताना व्हिडिओ व्हायरल; वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी निलंबित

आधी अरुंद असलेला 3.75 मीटर रस्ता तो आता रुंद करून 5.50 (साडेपाच) मीटर असा होणार असून साईडपट्ट्यांचे देखील काम करण्यात येणार आहे.अनेक गावांना जोडणारा मुख्य रस्ता प्रशस्त होणार असल्याने ग्रामस्थांनी (Pavan Maval) समाधान व्यक्त केले आहे.

या भूमिपूजन समारंभ प्रसंगी मा.सरपंच मनोज येवले, सुभाष येवले, अशोक साठे, मा.तंटामुक्ती अध्यक्ष गणेश मराठे, अक्षय महाराज येवले, श्रीकांत जाधव, मा.उपसरपंच सोमनाथ इंगळे, युवक अध्यक्ष काँग्रेस राजेश वाघोले, दशरथ येवले, संदिप भालेराव, अरुण रेणुसे, विकास गायकवाड, विठ्ठल येवले, युवराज केदारी, उमेश केदारी, अमोल सावळे, दिनेश गायकवाड, संजय शेडगे, गोरख येवले, निलेश येवले, दादू भालेसैन, केशव झेंडे, सोमनाथ शिंदे, लक्ष्मण येवले, छबुराव कडू, शांताराम वाघोले, राजू साठे, भरत वाजे, शिवाजी वाजे, निलेश रावडे, मयुर येवले आदि उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.