Maval : आंदर मावळातील रस्त्यासाठी 95 लाखांचा निधी

एमपीसी न्यूज – आंदर मावळ (Maval) परिसरातील ग्रामीण भागात दळणवळणाला गती मिळावी यासाठी वडेश्वर-कशाळ-ठोकळवाडी धरणालगत काम सुरु असलेल्या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन नुकतेच संपन्न झाले. हा रस्ता 800 मीटर लांब व साडेपाच मीटर रुंद होणार असून यासाठी एकूण 95 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.

या भुमिपुजन प्रसंगी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायण ठाकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष बाबाजी गायकवाड, मा.चेअरमन नारायण मालपोटे, कल्हाट सरपंच शिवाजी करवंदे, माजी सरपंच बळीराम भोईरकर, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस दिगंबर आगिवले, माजी उपसरपंच तुकाराम जाधव, मा. सरपंच विठ्ठल जाधव, शरद जाधव, अनिल जाधव, प्रशांत जाधव, सोमनाथ जाधव, नवनाथ जाधव, दत्ता जाधव, सुदाम ठाकर, गोरख पिंगळे, रोशन पिंगळे, मारुती करवंदे, वैभव पिंगळे, उत्तम शिंदे, मारुती जाधव, नंदू मदगे, मंगेश जाधव, नंदाराम जाधव,देविदास धनवे, छबू वाईकर, सुभाष पिंगळे,भरत जोरी, संतोष जाधव, मच्छिंद्र जगताप, सुभाष मा. जाधव, तानाजी शिंदे,शंकर जाधव आदी उपस्थित होते.

ICC World Cup : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी क्रिकेट वर्ल्डकप विशेष रेल्वे; मध्य रेल्वे सोडणार मुंबई ते अहमदाबाद विशेष रेल्वे

आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळमधील नदीवरील पूल,रस्ता रुंदीकरण, नवीन रस्ता करणे यासाठी (Maval) एकूण 46 कोटी 96 लाख रुपयांची विविध विकासकामे सध्या वेगाने सुरू आहेत. ग्रामीण भागातील गावांना जोडणारे अंतर कमी व्हावे यासाठी वडेश्वर-कशाळ-ठोकळवाडी धरणालगत असलेल्या पुलाचे काम देखील प्रगती पथावर असून लवकरच हा पुल वाहतूकीसाठी खुला होणार आहे. यामुळे आंदर मावळातील दोन भागात विभागलेल्या गावांच्या दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे.

आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळासह मावळ तालुक्यातील विकासकामांची घौडदौड येणाऱ्या काळात देखील अशीच सुरु ठेवण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.