ICC World Cup : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी क्रिकेट वर्ल्डकप विशेष रेल्वे ; मध्य रेल्वे सोडणार मुंबई ते अहमदाबाद विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज – क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा (ICC World Cup)अहमदाबाद येथे होणार आहे. महाराष्ट्रातून विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या क्रिकेट प्रेमींसाठी मध्य रेल्वेने विशेष सुविधा केली आहे. रविवारी होणाऱ्या या सामन्यासाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

01153 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – अहमदाबाद विशेष एक्सप्रेस सीएसएमटी स्थानकावरून शनिवारी (दि. 18) रात्री साडेदहा वाजता सुटेल. ही रेल्वे अहमदाबाद रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी 6.40 वाजता पोहोचेल.

क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना (ICC World Cup)अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर दुपारी दोन वाजता सुरु होईल. हा सामना रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे.

Kasarwadi : ट्रक अचानक रस्त्यात थांबल्याने पाठीमागून दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

क्रिकेट सामना झाल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी देखील विशेष रेल्वे सोडली जाणार आहे. 01154 अहमदाबाद – सीएसएमटी विशेष एक्सप्रेस सोमवारी (दि. 20) मध्यरात्री पावणे दोन वाजता अहमदाबाद रेल्वे स्थानकावरून सुटेल. ही रेल्वे सोमवारी सकाळी 10.35 वाजता सीएसएमटी स्थानकावर पोहोचेल.

ही विशेष रेल्वे दादर, ठाणे, वसई, सुरत, वडोदरा, अहमदाबाद स्थानकावर थांबेल. गाडीला 11 थ्री टायर, तीन टू एसी, एक फस्ट एसी, दोन स्लीपर असे 17 एलएचबी कोच असतील.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.