Talegaon Dabhade : तर त्या उपक्रमात माझा हिस्सा अर्धा राहील – सुनील शेळके

रोटरी क्लबच्या रोटरी ओपन जिमचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांनी ( Talegaon Dabhade) जर आगामी काळात ग्रामीण भागातील शाळा नूतनीकरणासाठी पुढाकार घेतला तर त्यात अर्धा खर्च माझा राहील, असे मत आमदार सुनील शेळके यांनी केले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्याकडून उभारण्यात आलेल्या रोटरी ओपन जिमचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. रोटरी क्लबचा सदस्य असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचेही शेळके म्हणाले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या कडून रोटरी ओपन जीमचा लोकार्पण सोहळा( दि 24) विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मावळचे आमदार सुनील  शेळके व डिस्ट्रिक्ट 3131 चे नियोजित प्रांतपाल रो.शीतल शहा यांच्या हस्ते संपन्न झाला.या सोहळ्यात तळेगाव दाभाडे येथील नागरिक व रोटरी सदस्य मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Pimpri : एकनाथ पवार करणार ठाकरे गटात प्रवेश; समर्थकांसह मुंबईला रवाना

आमदार शेळके यांनी मी या क्लबचा सदस्य असल्याचा अभिमान असून,भविष्य काळात ग्रामीण भागातील शाळा नूतनीकरणासाठी तुम्ही जर पुढाकार घेतला तर 50 टक्के रक्कम माझी राहीलअशी ग्वाही दिली.

नियोजित प्रांतपाल रो.शीतल शहा म्हणाले , रोटरी प्रांत 3131मध्ये रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे वेगळे, उल्लेखनीय प्रकल्प करत असून अध्यक्ष उद्धव चितळे आणि त्यांची टीम वर्षभर आणखी दर्जेदार प्रकल्प करतील ही आपल्याला खात्री आहे असे गौरवोद्गार काढले.

अध्यक्ष उद्धव चितळे,उपाध्यक्ष कमलेश कारले,सचिव श्रीसैल मेंथे यांच्या पुढाकारातून व प्रकल्प प्रमुख मंगेश गारोळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ओपन जिमसाठी माजी अध्यक्ष यादवेंद्र खळदे,दीपक शाह,आनंद असवले,डॉ सूर्यकांत पुणे,अशोक काळोखे,दीपक गंगोळी,निलेश वाघचौरे,संजय अडसूळ,डॉ गुरूप्रसाद कुलकर्णी, शशांक ओगले,चेतन नामजोशी,वेदांग महाजन यांनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद मुंगी,देवेंद्र कदम, ऋषिकेश कुलकर्णी, नितिन फाकटकर सर,मथुरे काका, राजू गोडबोले, हृषिकेश शेरिकर,प्रमोद दाभाडे, फर्स्ट लेडी अर्चना चितळे, दिपा कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम ( Talegaon Dabhade)  घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.