Pimpri : एकनाथ पवार करणार ठाकरे गटात प्रवेश; समर्थकांसह मुंबईला रवाना

एमपीसी न्यूज – भाजपच्या प्रदेश प्रवक्ते पदाचा ( Pimpri ) राजीनामा दिलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी सभागृह नेते एकनाथ पवार हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करणार आहेत. दुपारी बारा वाजता हा पक्षप्रवेश होणार असून पवार समर्थकांसह मुंबईला रवाना झाले आहेत.

Wagholi : पिझ्झा उशिरा आला म्हणून डिलिव्हरी बॉयला मारहाण करत गोळीबार, आरोपी अटकेत

मी मराठा योद्धा श्री मनोजजी जरांगे पाटील यांच्या आंदोलनास  पाठींबा देत भारतीय जनता पार्टीचा सर्व पदाचा राजीनामा दिला असून मराठा आरक्षणास पाठिंबा देत असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या गटात माझ्या जन्मदिनी आज बुधवारी ठीक 12:00 वा. पक्षप्रवेश करणार असल्याचे पवार यांनी फेसबुकवर सांगितले आहे.गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवबंधन बांधणार आहेत.

 

पवार यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने भाजपला खिंडार पडले आहे. पवार हे अतिशय जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांनी भाजपचा त्याग करत शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतला ( Pimpri ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.