Sunil Shelke : मावळला मंत्रिपदाचे वेध! आमदार शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त जोरदार फलकबाजी

एमपीसी न्यूज – मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मावळ तालुक्यात जोरदार (Sunil Shelke) फलकबाजी करण्यात आली आहे. अनेक शुभेच्छा फलकांवर आमदार शेळके यांचा ‘भावी मंत्री’ म्हणून उल्लेख करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. मदन बाफना, बाळा भेगडे यांच्यानंतर मावळला तिसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळणार का? याविषयी तालुक्यात उत्सुकता वाढली आहे.

आमदार शेळके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. नाट्यपूर्ण घडामोडींनंतर अजितदादांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर शेळके समर्थकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या असून त्यांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत.

भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यात प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत आमदार शेळके यांनी अजितदादांचा विश्वास संपादन केला. महाविकास आघाडीचे सरकार असताना अजितदादांनी आमदार शेळके यांना सदैव झुकते माप दिले होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर आमदार शेळके समर्थकांमध्ये (Sunil Shelke) काहीशी चिंतेचे वातावरण होते. शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्याने शेळके समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Mumbai : छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र ब्रेल लिपीत आणि 20 भाषेत ऑडिओ स्वरूपात होणार प्रकाशित

आगामी मंत्री मंडळ विस्तारात आमदार शेळके यांच्या गळ्यात नक्की माळ पडेल, असा दावा शेळके समर्थक करीत आहेत. आमदार शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यात ठिकठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. (Sunil Shelke) त्याद्वारे शेळके यांचा ‘भावी मंत्री’ असा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी अशा महायुतीतर्फे आगामी निवडणूक लढवली जाण्याच्या शक्यतेने तालुक्यातील भाजप कार्यकर्ते मात्र अस्वस्थ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांना मंत्रिपद देण्याबाबत भाजपा पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.