Bhosari : जीएसटी थकवल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जीएसटी थकवल्या प्रकरणी वस्तू व सेवा कर कार्यालयाच्या (Bhosari) तक्रारीवरून भोसरी परिसरातील दोन कंपन्यांच्या तीन जणांविरोधात मूल्यवर्धित कर कायदा कलम 2002 चे कलम 74 (3) (ह) व (ट) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे इंजिनिअरिंग टीन या व्यापारी संथेचे मालक मनोजकुमार बसंत पाल (रा. भोसरी), श्रीराम (Bhosari) कार्पोरेशन प्रा ली या व्यापारी संस्थेचे संचालक विठ्ठल कुंडलिक वेताळ (रा. भोसरी), श्रीराम कार्पोरेशन प्रा ली या व्यापारी संस्थेचे संचालक नारायण जिजाबा धायगुडे (रा. निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रवींद्र कवठेकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon Dabhade : घरात आलेल्या विषारी नागाला सोडले नैसर्गिक अधिवासात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोजकुमार पाल यांनी सन 2015 ते 2016 आणि सन 2017 ते 2018 या कालावधीत एकूण 65 लाख 49 हजार 428 रुपयांचा कर थकवला. तर आरोपी विठ्ठल वेताळ आणि नारायण धायगुडे यांनी 65 लाख 49 हजार 428 रुपयांचा कर थकवला, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.