Bhosari : कॅनडातील वर्क परमिट व कायम रहिवासी दर्जा काढण्याच्या बहाण्याने महिलेची आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कॅनडा देशातील वर्क परमिट व कायम रहिवासी दर्जा काढून देण्याच्या बहाण्याने महिलेची आठ लाखांची फसवणूक केली. ही घटना जानेवारी 2019 ते 5 मे 2019 या कालावधीत घडली.

साधना हरीसराय सिंग (वय 32, रा. इंद्रायणी नगर भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जतीन नरेंद्र सिंग ठाकूर (वय 34, रा. नरेगाव पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जतीन याने फिर्यादी साधना यांचे कॅनडातील वर्क परमिट व कायम रहिवासी दर्जा काढण्यासाठी स्वतः आठ लाख रुपये भरले आहेत, ते पैसे मानव गायधने याला द्यायचे आहेत. असे सांगून साधना यांच्याकडून मानव आणि अन्य काही जणांच्या बँक खात्यावर पैसे घेतले. त्यानंतर साधना यांनी त्यांचे वर्क परमिट व  कायम रहिवासी दर्जा कागदपत्रे तपासली असता जतिन याने काहीही काम केले नसल्याचे आढळून आले.  त्याने साधना यांच्याकडून आठ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.