Ayodhya Summer Special Train : पुण्याहून अयोध्यासाठी उन्हाळी विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज – अयोध्या येथे श्री राम लल्लाच्या दर्शनासाठी देशाच्या प्रत्येक भागातून ( Ayodhya Summer Special Train) भाविक जात असतात. पुणे परिसरातून देखील अनेक भाविक अयोध्येला जात असतात. उन्हाळ्यात अयोध्येला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने या मार्गावर विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 4 ते 9 मे या कालावधीत दोन्ही मार्गावर चार विशेष रेल्वे धावणार आहेत.

रेल्वे क्रमांक 01455 पुणे – अयोध्या उन्हाळी विशेष रेल्वे 3 मे आणि 7 मे रोजी सायंकाळी 07.30 वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून सुटेल. ही रेल्वे तिसऱ्या दिवशी सकाळी 08.50 वाजता अयोध्येला पोहोचेल.

Chinchwad : शहर पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

रेल्वे क्रमांक 01456 अयोध्या – पुणे उन्हाळी विशेष रेल्वे 5 आणि 9 मे रोजी सायंकाळी चार वाजता अयोध्या रेल्वे स्थानकावरून सुटेल. ही रेल्वे तिसऱ्या दिवशी पहाटे 03.55 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

ही रेल्वे चिंचवड, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाल, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी जंक्शन, ओराई, कानपूर, लखनऊ स्थानकांवर थांबेल. 1 मे पासून ऑनलाईन बुकिंग सुरु ( Ayodhya Summer Special Train) होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.