Bhosari Crime : गोडाऊनवर छापा मारून तीन लाख 34 हजारांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – गुटखा साठवून ठेवलेल्या एका गोडाऊनवर भोसरी पोलिसांनी छापा टाकला. त्यात पोलिसांनी दोघांना अटक करून गोडाऊनमधून तीन लाख 34 हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. 16) दुपारी दीड वाजताच्या सुमारास चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे करण्यात आली.

शंकर चिमनाजीराव गणेशकर (वय 41, रा. शांतीनगर, भोसरी), सोवरन रामकुमार प्रजापती (वय 21, रा. मेदनकरवाडी, चाकण, मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई सुमित देवकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला सुपारी, विमल पान मसाला तंबाखू, टोबॅको, प्रियमय निवास सुगंधित पान मसाला, जाफरानीजर्दा, सागर पान मसाला, महक पान मसाला, राजश्री पान मसाला या प्रकारचा गुटखा आरोपींनी देवकर वस्ती, चक्रपाणी वसाहत येथे एका खोलीत साठवून ठेवला होता. याबाबत भोसरी पोलिसांना माहिती मिळाली.

भोसरी पोलिसांनी गोडाऊनवर छापा मारून तीन लाख 34 हजार 385 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. त्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.